अंतिम कसोटी : हार्दिक पांड्याचे धमाकेदार शतक

Sri Lanka v India

भारत व श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कालच्या 6 बाद 329 धावांवरून आजचा खेळ सुरू झाला. आजच्या खेळाच्या दुसऱ्याच षटकात शहा बाद झाला त्यानंतर कुलदीप यादव व हार्दिक पांड्यादरम्यान 62 धावांची भागीदारी झाली. हार्दिक पांड्याने शानदार खेळ करत आपले पहिले कसोटी शतक साजरे केले. या खेळीदरम्यान पांड्याने 8 चौकार व 7 षटकारांची आतिषबाजी केली. कुलदीप यादवने 73 चेंडूत 26 धावा केल्या. कुलदीप यादव बाद झाल्यावर पांड्या व उमेश यादव यांच्यात 66 धावांची भागीदारी झाली. लंचनंतर दुसऱ्याच चेंडूवर भारताचा डाव 487 धावांवर समाप्त झाला. लंकेच्या पहिल्या डावात 3 बाद 38 धावा झाल्या आहेत.

@दृष्टीक्षेपात विक्रम@
1.कसोटीत एका षटकात भारतातर्फे सर्वाधिक 26 धावा करण्याचा विक्रम आज हार्दिक पांड्याने आपल्या नावावर केला. यापूर्वी संदीप पाटील व कपिल देव यांच्या नावावर 24 धावा एक षटकात करण्याचा विक्रम होता या दरम्यान पांड्याने 3 चौकार व 2 षटकार लगावले.

2. भारतातर्फे एका सत्रात सर्वाधीक धावा करण्याचा विक्रम पांड्याने आपल्या नावावर केला.यापूर्वी 99 धावांचा विक्रम सेहवागच्या नावावर होता.पांड्याने 107 धावा आज सकाळ सत्रात जमवल्या .