का हार्दिक पांड्याने मानले चाहत्यांचे आभार?

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या नेहमीच चर्चेत असतो. हार्दिक सोशल माध्यमावरही चांगलाच अॅक्टीव्ह असतो.इन्स्टाग्रामवर पांड्याचे २ मिलियन फॉलोवर झाले असून. २ मिलियन हा फार मोठा आकडा असून. पांड्याने या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. मला तुम्ही नेहमीच प्रेम दिले आहे. माझ्या चांगल्या वाईट काळात नेहमी साथ दिली आहे. याबद्दल मी तुमचा नेहमीच आभारी राहील.असा आभार व्यक्त करणारा व्हिडीओ हार्दिकने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.