भरवश्याच्या म्हशीला टोणगा; न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ अष्टपैलू खेळाडू बाहेर

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. कसोटी मालिकेच्या संघ निवडीआधी हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नसेल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये यूएईत झालेल्या आशिया कप स्पर्धेत खेळताना एका सामन्यादरम्यान हार्दिकच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यातून तो बरा झाला आणि २०१९ च्या विश्वचषकात खेळलाही. मात्र, आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेदरम्यान त्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढले. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

Loading...

दरम्यान, “न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही. त्याच्या पाठीच्या दुखापतीवर पुढील उपचार घेण्यासाठी तो लंडनला जाणार आहे.” BCCI चे सचिव जय शहा यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

हार्दिकनं न्यूझीलंड दौऱ्याच्या मध्यंतरापर्यंत कमबॅक करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. यापूर्वी हार्दिक म्हणाला होता की,’न्यूझीलंड मालिकेच्या मध्यंतरापर्यंत मी कमबॅक करेन. काही आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल आणि त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, हा माझा प्लान आहे. माझ्यासाठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप हा महत्त्वाचा आहे’.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार