हार्दीकच्या बचावासाठी धावले वडील ,म्हणाले ‘आमचा हार्दीक फार साधाभोळाआहे’

hardik-pandya

मुंबई : ‘काॅफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे अडचणीत आलेला क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या बचावासाठी त्याचे वडिल हिमांशू पांड्या पुढे आले आहेत.हार्दीकचा बचाव करताना तो फार साधाभोळा आहे,असं त्यांनी म्हटलं आहे.

कॉफी विद करण या टीव्ही शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बीसीसीआयने नोटीस पाठवत 24 तासात उत्तर मागितलं होतं. पण विनोद राय दोघांच्याही स्पष्टीकरणाने समाधानी झालेले नाहीत. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या दोन्ही खेळाडूंवर २ मॅचच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला आहे.

दरम्यान,मुलगा अडचणीत आलेला पाहून बचावासाठी त्याचे वडिल हिमांशू पांड्या पुढे आले आणि हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे हिमांशू पांड्या यांनी ?

तो फार साधाभोळा आहे.प्रेक्षकांचे मनोरंजन हा एकमेव त्याचा हेतू होता. हार्दिकने केलेले वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तो एक मनोरंजनात्मक कार्यक्रम होता. त्यानुसार त्याने गमतीने काही वक्तव्य केली.