fbpx

मानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून

टीम महाराष्ट्र देशा : कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या चांगलाच माध्यमांच्या जाळ्यात अडकला आहे. बीसीसीआयने आधीच हार्दिक पांड्यला निलंबित केले असून  आता खार जिमखानाने देखील त्याचे मानद सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या मानसिक तणावा खाली असल्याने त्याने स्वतःला खोली मध्ये बंद करून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हार्दिक चे वडील हिमांशु पांड्यायांनी दिलेल्या माहितीनुसार ,”ऑस्ट्रेलियातून परतल्यापासून त्याने घराबाहेर पाऊल टाकलेले नाही. तो कोणाच्या फोनचेही उत्तर देत नाही. त्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहिला आणि आराम केला. गुजरातमध्ये सणाचं वातावरण आहे. क्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याने गेल्या काही वर्षांत कुटुंबीयांसोबत तो सण साजरा करू शकला नव्हता. मात्र, आता तो घरी असूनही सण साजरा करत नाही.”

कॉफी विथ करण या कार्यक्रमात के एल राहुल आणि हार्दिक पांड्या यांना बोलवण्यात आल होत त्यावेळी हार्दिक पांड्याने महिलांचा अवमान करणारी वक्तव्य केली होती त्यामुळे त्यावर अनेक सामाजिक स्तरावरून पांड्याला ट्रोल करण्यात आले त्यामुळे पंड्या जबरदस्त मानसिक तणाव खाली आहे. सामाजिक स्तरावर हार्दिक पांड्याची प्रतिमा मलीन झालीच आहे आता बीसीसीआय ने देखील त्याला निलंबित केले आहे.