भारत सामना हरला पण चिंता नको …कारण कांगारूनां हलवण्यासाठी ‘तो’ झालाय सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : पर्थ येथे झालेल्या भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र, अशातच टीम इंडिसासाठी आनंदाची बातमी आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्ण येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची एन्ट्री झाली आहे. पांड्याच्या एन्ट्रीमुळे भारताला एक चांगला फलंदाज आणि चांगला गोलंदाजही मिळणार आहे.

बीसीसीसीआयने ट्वीट करुन पांड्याच्या संघातील समावेशाबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसासार भारीय संघाचे सिलेक्टर सरनदीप सिंह यांनी मुंबई आणि बडोदा यांच्यात सुरु असलेल्या रणजी ट्रॉपी सामन्या दरम्यान पांड्यासोबत चर्चा केली होती. यानंतर निवड समितीने संघात येण्याबद्दलचा निर्णय पांड्यावर सोडून दिला होता.

पांड्याच्या होकारानंतर बीसीसीआयने तो संघात येणार असल्याची माहिती दिली. पांड्याच्या संघात येणामुळे भारतीय संघाला उभारी मिळणार आहे. पांड्याच्या प्रवेशमुळे आता ७ फलंदाज आणि ५ गोलंदाजांना खेळविण्याच्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. याबरोबरच पांड्याच्या खेळण्यामुळे भारतीय संघासमोर रविचंद्र अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना एकावेळी खेळविण्याचा पर्याय मिळला आहे.