पांड्या न्यूझीलंड दौऱ्यातून ‘या’ कारणामुळे असणार बाहेर

टीम महाराष्ट्र देशा : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत ए संघात त्याचा समावेश नाही. तामिळनाडुचा कर्णधार विजय शंकरला संघात संधी मिळाली आहे. भारत ए संघ तीन लिस्ट ए सामने आणि दोन दिवसीय सामन्यांच्या आधी दोन एकदिवसीय सराव सामने खेळणार आहे.

भारतीय संघात आपलं स्थान टिकवायचं असेल तर खेळाडूंना यो-यो फिटनेस टेस्ट द्यावी लागते. मात्र भारत अ संघासाठी हा निकष लागू पडत नाही. तरीही हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड समिती १५ ऐवजी १६ किंवा १७ जणांची निवड करते का याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारताच्या मुख्य संघासोबतच भारताचा अ संघ देखील न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे गरज पडली तर निवड समितीकडे खेळाडूंचा पर्याय असेल.