fbpx

वादग्रस्त वक्तव्यामुळे हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल निलंबित

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांनी  शुक्रवारी एका टीव्ही कार्यक्रमामध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.त्यामुळेच या दोघांना शनिवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे.

या दोनही खेळाडूंनी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने वाद निर्माण झाला.प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी त्या दोघांवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव प्रशासकीय समिती समोर ठेवला होता.दरम्यान, प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निलंबित केले आहे.

2 Comments

Click here to post a comment