हार्दिक पांड्या: भारतीय संघाचा समतोल राखणारा ‘हुकमी एक्का’

स्वप्नील कडू: कपिल देव नंतर खऱ्या अर्थाने भारतीय संघालाअष्टपैलू खेळाडू मिळालाच नाही. तेज गोलंदाजी करू शकणारा व फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू आज हार्दिक पांड्याच्या रूपात भारतीय संघाला मिळाला आहे . अश्विन व जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळी आज करताय पण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्यांना अजूनही हवे तसे यश मिळालेले नाही.
hardik pandya all rounder player  हार्दिक पांड्याने भारतीय संघात पदार्पण केल्यापासून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आश्वासक सुरवात केली आहे. हार्दिक संघात आल्यापासून संघाचा समतोल उत्कृष्टरित्या साधला जात आहे. आशिया खंडाबाहेर इंग्लंड ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका या सारख्या देशात हार्दिक पांड्या अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. हार्दिक पांड्या सर्वप्रथम आय.पी.ल.दरम्यान प्रकाशझोतात आला. मुंबई इंडियन्सकडून शानदार खेळ केल्यानंतर हार्दिकला भारतीय 20-20 संघात स्थान मिळाले. आजपर्यंत पांड्या 19 आंतरराष्ट्रीय 20-20 सामने खेळला असून त्यात 15 विकेटस घेतल्या असून उपयुक्त फलंदाजीही केली आहे. hardik pandya all rounder player

एकदिवसीय 17 आंतरराष्ट्रीय सामन्यात पांड्याने 2 अर्धशतकासह 41.29च्या सरासरीने 289 धावा केल्या असून 19 विकेट्सही घेतल्या आहेत. नुकतेच पांड्याने श्रीलंकेत कसोटी संघात पदार्पण केले असून 2 सामन्यात 70 धावा फटकावल्या असून 3 विकेट्सही घेतल्या आहेत. कर्णधार विराट कोहली पांड्याच्या प्रगतीविषयी समाधानी असून हार्दिक पांड्या भारताचा बेन स्टोक्स बनू शकतो असेही म्हंटले आहे. पांड्याचा खेळ असाच बहरात राहिला तर तो 2019 च्या वर्ल्डकप मध्ये भारताचा हुकमी एक्का ठरू शकतो

hardik pandya all rounder player

You might also like
Comments
Loading...