हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; आनंद व्यक्त करत फोटो केला शेअर

Hardik-Natasha

मुंबई : आज अष्टपैलू खेळाडू हार्दिक-नताशा आई बाबा झाल्याचे हार्दिकने ट्विट करून सांगितलं. त्यांना पुत्ररत्न झाले. ट्विटसोबत त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे . हार्दिक पांड्याने आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. तसेच हार्दिकने नताशा गरोदर असल्याचे फोटो शेअर केले होते.

2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यानं नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करण्याचे जाहीर केले. त्यानंतर दोघांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला. हार्दिकनं ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली. गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करून गुपचूप लग्नही उरकले. बाप होण्याची जबाबदारी खांद्यावर आल्यापासून हार्दिक जबाबदार झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रेग्नंट नताशाला प्रसन्न ठेवण्यासाठी त्यानं फुलांचा गुच्छा भेट दिला होता.

धक्कादायक : गर्भात असतानाच बाळाला कोरोनोचा संसर्ग;ससून रुग्णालयात घडली दुर्मिळ घटना

लॉकडाउनच्या काळात भारतीयांची सर्वाधिक पसंती ‘या’ पदार्थाला

राफेल विमानांचं भारतीय भूमीवर आगमन!