खऱ्या आयुष्यात देखील राणा एकही दिवस चुकवत नाही ही एक गोष्ट.

जाणून घ्या सविस्तर कोणती आहे ती गोष्ट?

टीम महाराष्ट्र देशा – झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणा म्हणजेच हार्दिक जोशी  मालिकेमुळे घरा- घरात पोचला आहे. या मालिकेत हार्दिक अस्स्खलित कोल्हापुरी भाषेत बोलताना दिसतो. त्याला पाहून हार्दिक मूळचा कोल्हापूरचाच आहे की काय असा अनेकांचा समज आहे. मात्र हार्दिक मूळचा मुंबईकर आहे. मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी मी तिथल्या लोकांचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांच्या बोलण्याचा वेग, भाषेचा अचूक लहेजा पकडल्याचे तो सांगतो. मालिकेत जसा राणादा एकही दिवस तालीम चुकवत नाही त्याप्रमाणे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही हार्दिक एकही दिवस जीमला दांडी मारत नाही. मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी हार्दिकचे वजन ७२ किलो होते. पण भूमिकेसाठी आपण दीड महिन्यात त्याने २२ किलोपर्यंत वजन वाढवले. गेल्या दीड वर्षापासून त्याने वजन मेंटेन ठेवले आहे. याबाबत तो म्हणाला, मला जिमची खूप आवड आहे. रात्री १२ वाजता शूटिंग संपले तरी मी न चुकता व्यायाम करतो. वजन वाढवण्यासाठी मला अभिनेता जॉन अब्राहमच्या फिटनेस ट्रेनर विनोद खन्ना यांची खूप मदत झाली. मात्र माझी आई हीच माझी पहिली फिटनेस गुरू असल्याचे सांगायलाही तो विसरत नाही. आजही आईचे माझ्या तब्येतीकडे खूप बारकाईने लक्ष असल्याचे हार्दिक सांगतो.