गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्याला कंठस्नान

naxal

गडचिरोली:गेल्या वर्षभरात तब्बल 19 नक्षल्यांना यमसदनी पाठवल्यानंतर नवीन वर्षातही पोलिसांची कामगिरी उत्तम राहिली आहे. जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली जंगलात बुधवारी 10 जानेवारी रोजी झालेल्या चकमकीत पोलिसांनी एका जहाल नक्षलवाद्याला कंठस्नान घातले आहे.

यासंदर्भात हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार जलद प्रतिसाद दल,एटापल्लीचे जवान हे ताडपल्ली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना संध्याकाळी 5 वाजेच्या सुमाराला जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यानी जलद प्रतिसाद दलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला . यावेळी पोलिसांनी नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर पोलिसांकडून मिळालेल्या जोरदार प्रत्युत्तरापुढे हतबल झालेल्या नक्षलवाद्यांनी अखेर जंगलात पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहिम राबवली असता त्यात एका नक्षल्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या जवळून एक 303 रायफल , 4 जिवंत काडतूसे आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आले. मृत नक्षलवाद्यांचे ओळख पटविण्याचे काम चालू असून या घटनेनंतर सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.