विराट विषयी विचारल्यानंतर का भडकला हरभजन ?

पत्रकार आणि खेळाडू यांच्यातील वाद काही नवीन नाही. पत्रकार असा काही प्रश्न विचारतात की खेळाडू त्यावर भडकतात. आणि यातूनच सुरु होतो वाद. १७ सप्टेंबर पासून भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजला सुरुवात होत आहे त्याआधीच एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन पत्रकार डेनिस फ्रीडमैन यांने विराट कोहलीला स्वीपर म्हणजेच झाडू लावणारा असे संबोधले आहे. डेनिसच्या या ट्वीटमुळे हरभजन सिंगचा पारा मात्र भलताच चढला.त्याने डेनिसला सडेतोड उत्तर दिले.

कोणीही विराट बनू शकत नाही. जब एक हाथी गली में चलता है तो वहां के कुत्ते भौंकते ही हैं. त्यामुळे अशा भोकणाऱ्या कुत्र्याकडे विराटला लक्ष देण्याची गरज नाही.अशा कडक शब्दात हरभजनने डेनिसला सुनावले आहे. पुढे बोलताना हरभजन म्हणाला एका पत्रकाराने असे बोलणे फार चुकीचे आहे. कोणत्याही व्यक्तीला प्रतिष्ठा फार महत्त्वाची असते. आपण सर्व माणूस आहोत आणि माणुसकीनेच वागले पाहिजे. टीका करताना माणसाचा विचार करावा मग तो भारतीय असो वा पाकिस्तानी किवां ऑस्ट्रेलियन.

You might also like
Comments
Loading...