मोहम्मद सिराजबाबतचा ‘विराट’ प्रश्न हरभजनने सोडवला चुटकीसरशी!

विराट

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनीही साऊथॅम्प्टन येथे सराव सुरू केला आहे. कोरोना प्रोटोकॉलमुळे भारतीय खेळाडूंना सध्या तीन-चार गटात सराव करण्याची परवानगी होती. मात्र आजपासून संपूर्ण भारतीय संघ एकत्र करत आहे.

सराव सत्रादरम्यान सर्वांची नजर मोहम्मद सिराजकडे असेल. कारण अंतिम सामन्यासाठी सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यास संघ व्यवस्थापन उत्सुक आहे. सराव दरम्यान जर सिराज आपली कौशल्य सिद्ध केले तर त्याला अंतिम सामन्यात खेळवण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार मोहम्मद सिराजला इशांत शर्माच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकेल. परंतु हा एक कठीण निर्णय असू शकतो. ऑगस्ट 2019 च्या वेस्ट इंडीज दौर्‍यानंतर प्रथमच इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे सर्व निवडण्यासाठी उपलब्ध आहेत. अलिकडच्या वर्षांत परदेशात भारताच्या यशासाठी तिघेही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

अशातच विराटचा प्रॉब्लेम हेरुन टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने विराटला खास सल्ला देत त्याचा प्रॉब्लेम सोडवला आहे.  पीटीआयशी बोलताना हरभजन म्हणाला, “की जर मी कॅप्टन असतो तर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मी तीन वेगवान गोलंदाजांसह उतरलो असतो. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी माझी पहिली पसंती असती तसंच मी ईशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजला खेळवलं असतं. इशांत एक शानदार गोलंदाज आहे परंतु पाठीमागच्या काही मॅचेसचा परफॉर्मन्स पाहता माझं मत मी सिराजच्या पारड्यात टाकलं असतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली सिराजची कामगिरी नक्कीच नजरेआड करण्यासारखी नाही.”

महत्वाच्या बातम्या

IMP