चौकशी अधिकाऱ्यांकडून छळ होतोय ; रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव

rashmi

हैद्राबाद : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे विविध पुरावे सादर केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी इतर नेत्यांचे देखील फोन टॅपिंग करून फडणवीसांना मदत केल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील नेते करत होते.

या प्रकरणात त्यांना चौकशीस हजर राहण्याचे समन्स मुंबई पोलिसांनी पाठवले होते. मात्र, त्यांनी दोन्ही वेळा असमर्थता दर्शवत थेट हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप करत त्यांनी चौकशीस बोलावण्याबाबत दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची याचिका याचिका शुक्रवारी दाखल केली आहे. आता या याचिकेवर ६ मे ला हैद्राबाद हायकोर्टात सुनवाणी होणार आहे. दरम्यान, या याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि SP सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी २८ एप्रिलला हजर राहण्याचे समन्स रश्मी शुक्ला यांना पाठवण्यात आले होते. मात्र सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं शुक्ला यांनी कळवलं आहे. कोरोनाचे कारण देत त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर झाल्या नव्हत्या. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला यावेळी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या