VIDEO- राज ठाकरेंच्या ‘रॅपिड’ यॉर्करवर शरद पवारांचे ‘पॉवरफुल्ल’ सिक्सर

राज की उद्धव ? राजच्या यॉर्करवर पवारांचा षटकार

पुणे : पुण्यात ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी पवारांनी राज यांच्या रोखठोक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. या मुलाखतीतील शेवटच्या ‘रॅपीड फायर’ प्रश्नांत राज ठाकरे यांनी शरद पवारांना उद्धव ठाकरे की राज ठाकरे ? यामधील निवडीबाबत प्रश्न विचारात शरद पवारांना अडचणीत टाकल पण राज यांच्या या यॉर्करवर शरद पवारांनी थेट षटकार मारला.