fbpx

‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला जातो…

sharad pawar and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी- ६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

दरम्यान,महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. “गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही”. अशा शब्दांत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे.