…तर शरद पवार पंतप्रधान झाले असते

sharad-pawar 1

टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार जेव्हा नाही -नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते असे सांगत शरद पवार यांनी जर त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते आज पंतप्रधान झाले असते अस मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल आहे. शरद पवार आपले गुरु आहेत आणि ते अतिशय चलाख व शार्प आहेत. त्यांना पुढचे अर्थात वा-याची दिशा अगोदर कळते. असे गुरु आहेत हे माझे भाग्य आहे. पवार हे सर्वधर्म समभावाची पताका घेऊन पुढे निघाले आहेत’, अशी स्तुतीसुमन सुद्धा त्यांनी शरद पवारांवर उधळली. सोलापुरात बुधवारी आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण खूप जवळून पहिले आहे. मुख्यमंत्री आणि हिमाचलचे प्रभारी असताना आम्ही भेटायचो. मात्र मोदी हे चहा विकत होते असे मला कधीच ऐकण्यात आले नाही. ते आत्ताच चहावाले झाले असावेत. असो चहावाल्यांसाठी त्यांनी आतातरी काही करावे असा टोला शिंदे यांनी मोदी यांना लगावला.