fbpx

नवाझुद्दीनच्या ‘हरामखोर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

नवाझुद्दीनच्या ‘हरामखोर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून नवाझुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी यांच्या यात मुख्य भूमिका असून हा प्रेमाचा त्रिकोण यात दाखवण्यात आला आहे. गुनित मोंगा, अनुराग कश्यप यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात एक ग्रामीण कथानक दाखवण्यात आलं आहे. श्लोक शर्मा यानी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे.

एक शिक्षक, आणि एक मुलगा या दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम असते. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बालकलाकारांमध्ये रंगलेली जुगलबंदी सुरेख दाखवण्यात आली आहे. ट्रेलर पाहताना तुम्ही फार हसता तर मध्येच गंभीरही होता. सिनेमातल्या कलाकारांचा अभिनय या ट्रेलरमध्ये अजून जीवंतपणा आणतो.

नवाजुद्दीन हा नेहमीप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीच्या भूमिकेत बघायला मिळत आहे. या सिनेमात रिअ‍ॅलिटीवर जास्त भर देण्यात आला आहे. भाषा, कॉस्च्युम यावरही मेहनत घेण्यात आली आहे.अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी हा प्रत्येक सिनेमात काहीतरी नवं करण्याच्या प्रयत्नात असतो. अतिशय वेगळ्या भूमिका त्याने आतापर्यंत साकारल्या आहेत. आता पुन्हा एकदा नवाज एका वेगळ्याच भूमिकेत ‘हरामखोर’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘हरामखोर’ हा सिनेमा विद्यार्थिनी आणि शिक्षकाच्या प्रेमाची कथा असल्याचे ट्रेलरवरून वाटते.