‘शरद पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच!’, शिवसेनेने पुन्हा ‘तो’ मुद्दा छेडला

मुंबई : काल, दि.१० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन साजरा झाला. काँग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर शरद पवारांना राष्ट्रवादीची मोट बांधली होती. तेव्हापासून पवार समर्थकांचे पवारांना पंतप्रधान पदी पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. काँग्रेसमध्ये असते तर कदाचित परिस्थिती वेगळी राहिली असती. मात्र, पवारांना पंतप्रधान होण्याच्या मुद्द्यावरून विरोधक नेहमी त्यांनी डिवचत असतात. पूर्वी शिवसेनेने देखील यावरून पवारांवर अनेकदा टोले लगावलेत. पण आता शिवसेनेने चक्क मनातून पवारांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्याचे झाले असे की, शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधान आले आहे. ही भेट राजकीय नसल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरुन या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावर शिवेसनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

IMP