fbpx

शिवसेनेला मुख्यमंत्र्यांकडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!

Nagpur cm

मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना या पक्षाची स्थापना केली होती. आज शिवसेना पक्ष आपला ५२ वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करत आहेत.

गोरेगाव येथे हा वर्धापनदिन साजरा होत असून,या वर्धापनदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी फडणवीस यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण देखील काढली आहे.राज्यातील शिवसैनिकांनाही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पक्ष कसा चालवायचा ते मी शिवसेनाप्रमुखांकडून शिकलो, इतरांनी धडे देण्याची गरज नाही

वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को संकुलात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱयांचे राज्यव्यापी शिबीर पक्षाने आयोजित केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.