बॉलिवूडच्या ‘ड्रीमगर्ल’ यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा…

hema malini

मुंबई : बॉलिवूडच्या ‘ड्रीमगर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांना 72वा वाढदिवसा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा, पद्मश्री पुरस्कारने गौरव असलेल्या उत्तम नृत्य, अभिनय आणि सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून हेमा मालिनी प्रसिद्ध आहेत. वयाच्या 72व्या वर्षीही देखील हेमा मालिनी त्यांच्या सौन्दर्याने  आणि फिटनेसने लोकांना घायाळ  करतात.

(१६ ऑक्टोबर, इ.स. १९४८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, दिग्दर्शक, भरतनाट्यम नर्तकी तसेच भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य आहे. १९६८ सालच्या सपनो का सौदागर ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. १९७०च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. १९७२ सालच्या सीता और गीता चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

१९८० साली हेमा मालिनीने सह-अभिनेता धर्मेंद्र सोबत विवाह केला. इ.स. २००० मध्ये भारत सरकारने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला पद्मश्री पुरस्कार बहाल केला. फेब्रुवारी २००४ मध्ये हेमा मालिनीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या.

महत्वाच्या बातम्या