Birthday Special- ऑस्कर विजेता ए. आर. रहमान बद्दल जाणून घ्या या गोष्टी

a r rahman happy birthday

टीम महाराष्ट्र देशा :  6 जानेवारी 1966 साली तामिळनाडूमधील संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या ए. आर. रहमान यांनी आज वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. ए. आर. रहमान यांच्या सांगितिक कारकिर्दीविषयी त्यांच्या चाहत्यांना बरंच काही माहित आहे. मात्र त्यांचे खासगी आयुष्य फार कमी जणांना माहित आहे. ए. आर. रहमान हे त्यांचे खरे नाव नाहीये. ए. एस. दिलीप कुमार हे त्यांचे खरे नाव आहे. त्यांनी आपले नावच नव्हे तर धर्मही बदलला आहे.

भारतीय संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायक ए.आर. रहमान यांना संपूर्ण जगात ओळखले जाते. त्यांचे खरे नाव ए. एस. दिलीप कुमार असे आहे. त्यांचे आईवडील हिंदू होते. रहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांची आई त्यांच्या वडिलांचे म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्स भाड्याने देत असे. याच काळात एका पीर बाबांच्या संपर्कात रहमान यांचे कुटुंबीय आले. त्यांच्या आई पीरबाबांची सेवा करायच्या. तेही त्यांच्या आईला अगदी मुलीप्रमाणे मानायचे. पीरबाबांचे रहमान यांच्यासोबतही घट्ट नाते जुळले होते. दरम्यान रहमान यांना त्यांचे दिलीप कुमार हे नाव कधीच आवडले नव्हते. हे नाव आपल्या प्रतिमेला शोभेसे नसल्याचे त्यांना वाटायचे.

म्हणून बदलला धर्म…
एका मुलाखतीत रहमान यांनी आपले नाव आणि धर्म बदलण्याच्या कारणाविषयी खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते, ”सूफी गाणी गायला सुरुवात करण्यापूर्वी ते आपल्या आईसोबत बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तिची जन्मपत्रिका दाखवायला एका हिंदू ज्योतिषाकडे गेले होते. याचदरम्यान रहमान यांनी त्या ज्योतिषाकडे आपले नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी रहमानला दोन नावे सुचवली. एक अब्दुल रहमान आणि दुसरे अब्दुल रहीम. मात्र रहमान यांनी त्यांच्या आईच्या सल्ल्याने अल्लारक्खा रहमान म्हणजेच ए. आर. रहमान हे नाव ठेवले.” ही 1989 मधील गोष्ट आहे. वडिलांच्या निधनाच्या दहा वर्षांनी रहमान यांनी आपले नाव आणि धर्म बदलला. रहमान हे त्यांना एका हिंदू ज्योतिषाने दिलेले नाव आहे तर अल्लारखा हे त्यांच्या आईने त्यांना दिलेले नाव आहे. अल्लारखाचा अर्थ Protected by God असा होतो. अशाप्रकारे ए.एस. दिलीप कुमारचे ते ए. आर. रहमान झाले.

अनेक पुरस्कारांचे ठरले मानकरी…
ए. आर. रहमान यांनी 1992 पासून आजवर अनेक भाषांमधील सिनेमांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्याने संगीत दिलेले काही उल्लेखनीय सिनेमे आहेत. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या इंग्रजी सिनेमाच्या संगीतासाठी ए. आर. रहमानाला ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत. रहमान ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. त्यांना ‘स्लमडॉग मिलेनियर’ या सिनेमासाठी तीन ऑस्कर नामांकन मिळाले. या सिनेमातील ‘जय हो’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट साउंडट्रॅक ऑस्कर मिळाला आहे.

The Indian musician is a double Oscar-winner for his original songs in Danny Boyle's 'Slumdog Millionaire'.रहमान यांचे वडील आर.के. शेखर मल्याळम सिनेमांचे संगीतकार होते. रहमान यांनी आपले सांगितिक शिक्षण मास्टर धनराज यांच्याकडून घेतले. वयाच्या 11 व्या वर्षी रहमान यांनी त्यांचे बालमित्र शिवमणी यांच्यासोबत बँड रुट्ससाठी की-बोर्ड वाजवण्याचे काम केले होते. बँड ग्रुपसाठी काम करत असताना रहमान यांना लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिककडून स्कॉलरशिप मिळाली होती. येथे त्यांनी पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतात पदवीप्राप्त केली. 

ए.आर. रहमान यांच्या पत्नीचे नाव सायरा बानो आहे. त्यांना तीन मुले असून खदीजा, रहीम आणि अमन ही त्यांची नावे आहेत.

गोल्डन ग्लोब अवॉर्ड प्राप्त करणारे रहमान पहिले भारतीय आहेत. 

1992 मध्ये रहमान यांनी मणिरत्नम दिग्दर्शित ‘रोजा’ या सिनेमाला संगीत दिले होते. त्यांचा पहिलाच सिनेमा म्युझिकल हिट ठरला आणि ते फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांनी अनेक जाहिरातींसाठीही जिंगल बनवले असून संगीतही दिले आहे. 

रेहमान यांनी प्रभूदेवा आणि शोभना यांच्यासोबत मिळून तामिळ सिनेमांच्या डान्सर्सचा एक ग्रुप तयार केला. या ग्रुपने मायकल जॅक्सनसोबत स्टेज शो केले होते. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...