Amir Khan: हॅप्पी बर्थ डे मिस्टर परफेक्शनिस्ट

आज मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खानचा बर्थ डे. 14 मार्च 1965 रोजी आमिरचा जन्म मुंबईत झाला. आमिर खानचे वडिल ताहिर हुसैन एक फिल्म निर्माता होते आणि त्यांचे काका, नासिर हुसैन एक फिल्म निर्मात्यासोबतच दिग्दर्शक देखील होते.
आमिर खान एका सिनेमाशी संबंधीत असलेल्या कुटुंबात झाला. त्यामुळे आमिर खानची आवड कायम सिनेमाशी जोडलेली आहे. गेल्या 3 दशकांपासून आमिर खानने आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आमिर खानला भारत सरकारकडून 2003 साली पद्मश्री आणि 2010 साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

 

  •  आमिर खानचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान. मात्र आमिर खान बॉलिवूडमध्ये आमिर याच नावाने लोकप्रिय आहे.
  •  आमिर खानने वयाच्या 8 व्या वर्षी ‘यादों की बारात’ या सिनेमांत बालकलाकार म्हणून पहिले काम केले.
  • आमिर खान लहानपणी गर्ल्स स्कूलमध्ये शिकला आहे. त्या शाळेत 5 वीपर्यंत मुलं देखील शिकू शकत होते. आणि हेच कारण आहे आमिर खानचे मित्र कमी असून मैत्रिणी जास्त आहेत.
  •  आमिर खानने 21 वर्षाचा झाल्यावर आपली गर्लफ्रेंड रिनासोबत गपचुप लग्न केले होते. त्याने जेव्हा लग्न केले तेव्हा त्याचा ‘कयामत से कयामत तक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार होता.
  •  आमिर खानने आपली पहिली पत्नी रिना हिच्याशी 17 वर्षाचे लग्नाचे नाते तोडून किरण राव सोबत लग्न केले होते. किरण रावची ओळख लगानच्या सेटवर झाली.
  •  आमिर खानची पत्नी किरण रावच्या मते आमिरला ईटिंग डिसऑर्डर असून त्याला आंघोळ करणे पसंद नाही.
You might also like
Comments
Loading...