आज मोदींचा ६९ वा वाढदिवस, दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

modi

टीम महाराष्ट्र देशा : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ६९ वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्यावर देशासह जगातील दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच ट्वीटरवर सोमवारी रात्रीपासूनच #HappyBirthdayNarendraModi टॉप ट्रेंडमध्ये आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहते ट्वीटरचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

देशाचे गृहमंत्री आणि मोदींचे मित्र अमित शाह यांनी दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व आणि अथक परिश्रमचे प्रतिक देशातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वात भारताने जगात एक मजबूत, सुरक्षित आणि विश्वसनीय देशाच्या रुपात आपली ओळख बनवली आहे. विकासासोबतच भारतीय संस्कृतीला आणखी समृद्ध करण्यात मोदीजी यांचं अभूतपूर्व योगदान आहे असं ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी तुम्हाला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य काभो असं त्यांनी म्हटले आहे. तसेच नितीन गडकरी यांनीही नरेंद्र भाई, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही निरोगी आणि दीर्घायुषी व्हावे, तसेच भारताला विश्व गुरु बनवण्याच्या आमच्या सर्वांच्या स्वप्नांना आम्ही तुमच्या नेतृत्वात पूर्ण करु, अशी प्रार्थना करतो असं म्हटले आहे.

दरम्यान नरेंद्र मोदींचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातच्या वडनगर या छोट्याशा गावात झाला. गरीबीची परिस्थिती असल्यानं त्यांनी वडिलांसोबत वडनगर रेल्वे स्थानकात चहा विकण्याचं काम करायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांना देशसेवा करण्याची आवड लागली आणि त्यांनी मागे वळून पहिले नाही. ते १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि आता जगातील लोकप्रिय व्यक्तीमत्वांपैकी एक आहेत.