fbpx

हनुमान मुस्लीम नव्हे तर जाट होता, भाजपनेत्याचा दावा

टीम महाराष्ट्र देशा- भाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच आहे. बुद्धी आणि शक्तीचा उत्तम संगम असणारे रामभक्त हनुमान मुसलमान होते असा अजब दावा भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी केला होता. आता बुक्कल यांनी केलेल्या वक्तव्याच्या एक पाऊल टाकत उत्तर प्रदेशचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी हनुमान हा जाट असल्याचा दावा केलाय.

कुणीही संकटात असेल तर हनुमान त्याला मदत करायचा. जाट समाजाचे लोकही एखादी व्यक्ती ओळखीची नसेल किंवा एखाद्या प्रकरणाशी आपला संबंध नसला तरी संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करतात. हे सर्व गुण पाहता हनुमान जाट समाजाचाच असावा, असे लक्ष्मी नारायण चौधरी यांनी म्हटले आहे.

आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित-आदिवासी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर अलवार येथे प्रचारसभेत बोलताना सत्यपाल सिंह यांनी हनुमानजी हे दलित नाही तर आर्य होते असे म्हटले होते. यापुढे एक पाऊल टाकत अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षांनी हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते असं वक्तव्य करून अकलेचे तारे तोडले होते.