भाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच,हनुमान मुस्लीम असल्याचा भाजप आमदाराचा दावा

टीम महाराष्ट्र देशा- भाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच आहे. बुद्धी आणि शक्तीचा उत्तम संगम असणारे रामभक्त हनुमान मुसलमान होते असा अजब दावा भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी केला आहे. तसेच यासाठी त्यांनी एक अजब तर्कही मांडला आहे.

हनुमान हे मुस्लीम होते म्हणूनच मुसलमानांची नावे ही रहमान, रमजान, फरमान, झीशान, कुर्बान अशी ठेवली जातात. ती त्यांच्या नावावरच ठेवली जातात, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार बुक्कल नवाब यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित-आदिवासी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर अलवार येथे प्रचारसभेत बोलताना सत्यपाल सिंह यांनी हनुमानजी हे दलित नाही तर आर्य होते असे म्हटले होते. यापुढे एक पाऊल टाकत अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षांनी हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते असं वक्तव्य करून अकलेचे तारे तोडले होते.Loading…
Loading...