चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्द्यावर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. भोंगे हटणार नसतील तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. तर हनुमान चालीसा मातोश्री समोर पठण करणार असे, राणा दाम्पत्य यांनी शिवसेनेला आव्हान दिले होते. त्यामुळे राणा दाम्पत्य यांना अटकही झाली होती. आता राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भोंगा आणि हनुमान चालीसा या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.
“हनुमान चालीसा किंवा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करणे, हे या लोकांचे राजकीय अपयश आहे. यांना मूर्ख म्हटले तरी काही हरकत नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी मनसे आणि भाजपला अप्रत्यक्ष सुनावले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीबहुल आणि दुर्गम अशा जिवाटी तालुक्यात अनेक गुड्यांवर लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, “आज ब्रेकिंग देणाऱ्या लोकांना माध्यमे स्थान देत आहेत आणि त्यांना मोठे केलं जात आहे. आज विधायक कार्यक्रम कमी आणि हनुमान चालीसासारखे कार्यक्रम ब्रेकिंग म्हणून अधिक दाखवले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी माध्यमांवर केली.
महत्त्वाच्या बातम्या :