हनुमा विहारीचे भाजप खासदाराला सणसणीत प्रत्युत्तर

hanuma vihari

मुंबई : जखमी हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांची खेळपट्टीवर उभी राहण्याची जिद्द आणि सयंमी बॅटिंगमुळे भारतानं सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात यश मिळवले होते. ही टेस्ट ड़्रॉ झाल्यानं सध्या ही सीरिज 1-1 अशी बरोबरी केली. हनुमा विहारीच्या या कामगिरीचे क्रिकेटच्या जाणकारांडून एकाबाजूला कौतुक होत आहे. पण गायक, भाजपा नेता आणि खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र विहारीच्या खेळावर टीका केली होती.

“फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी १०९ चेंडू खेळला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही, तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. क्रिकेटमधलं मला काही कळत नाही” असंसुद्धा बाबुल सुप्रियो यांनी टि्वटमध्ये म्हटलं होत. “हनुमा विहारीने पुढाकार घेऊन खराब चेंडू सीमापार धाडले असते तर भारताने कदाचित ऐतिहासि विजयाची नोंद केली असती” असे बाबुल सुप्रियो म्हणाले होते. “कोणी अपेक्षा केली नव्हती, ते पंतने करुन दाखवले. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडू सीमापार मारायला पाहिजे होते” असे बाबुल सुप्रियो म्हणाले होते.

हनुमा विहारीने भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अश्विननेही फिरकी घेतली आहे. हनुमाने बाबुल सुप्रियाच्या ट्विटला प्रत्युतर देत टोला लगावला आहे. सुप्रिया यांनी हनुमा विहारीवर संथ खेळीवरुन टीका केली होती. या ट्विटमध्ये सुप्रिया यांच्याकडून हनुमाचं आडनाव लिहिताना चुक केली. सु्प्रिया यांनी विहारीऐवजी बिहारी लिहिलं. यावरुन विहारीने सुप्रियो यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. तसेच हनुमाने सुप्रिया यांच्या ट्विटखाली आपलं अचूक नाव लिहित सणसणीत प्रत्युतर दिलं. या प्रत्युतराचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. तसेच अश्विनने हा स्क्रीनशॉट शेअर करत सुप्रिया यांची फिरकी घेतली.

महत्वाच्या बातम्या

पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा

खोतकरांनी डरकाळी फोडली, आता वाट पाहा ; अब्दुल सत्तार

सरकारने अहंकार दूर ठेवावा, आगीशी खेळण्याची ही वेळ नाही : शत्रुघ्न सिन्हा

सरकारने अहंकार दूर ठेवावा, आगीशी खेळण्याची ही वेळ नाही : शत्रुघ्न सिन्हा