‘वसुलीसाठी सरसावणारे हात मदतीसाठी मागे येतात’, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

‘वसुलीसाठी सरसावणारे हात मदतीसाठी मागे येतात’, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सरकारमध्ये चाललेय तरी काय ? विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा आहे. वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की, ‘कासव’ ! असं म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. ️

याचाच आधार घेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘वसुलीसाठी सरसावणारे हात मदतीसाठी मागे येतात. राज्य सरकारच्या या कार्यपद्धतीवर बोट ठेवताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीससा-कासवाच्या गोष्टीचा आधार घेतलाय. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत मराठवाडा, विदर्भातील शेतकरी कसा विदीर्ण झाला, ही सत्यस्थिती त्यांनी मांडलीये अशी टीका पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले, मार्च, एप्रिल, मे 2021 मध्ये अतिवृष्टी झाली तर मदतीचा जीआर 6 ऑक्टोबर 2021 ला, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली तर मदतीची प्रेसनोट 7 ऑक्टोबर 2021 रोजी. सहा-आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार?‘वसुली’साठी धावणारे सरकार, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी का असे धडपडतेय?

विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी 50 हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत?मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक आहेत.️ मार्च ते मे 2021 मध्ये करण्यात आलेल्या मदतीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, संपूर्ण रत्नागिरी जिल्हा 5.10 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1.74 लाख, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 39 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख रुपये फक्त देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या