गुजरात भाजपची जबादारी आता चंद्रकांत पाटलांच्या खांद्यावर…

bjp flag

सुरत : गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी माणसाची वर्णी लागली आहे. योगायोग म्हणजे महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही ‘चंद्रकांत पाटील’ नामक नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे लोकसभेचे खासदार सीआर पाटील यांची गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातच्या नवसारी लोकसभा मतदारसंघातून सीआर पाटील हे सर्वात मोठ्या फरकाने विजयी झाले होते. त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला ६.८९ लाख मतांनी पराभूत केलं होतं. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे निकटवर्ती मानले जातात.

गुजरात भाजपचे अध्यक्ष जीतूभाई वाघानी यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षीच संपला होता. पक्ष नव्या अध्यक्षांच्या शोधात होता. आता गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सीआर पाटील यांना राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, आगामी काळात गुजरातमधील विधानसभेच्या ८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. अशा परिस्थितीत सीआर पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यावर काही काळातच आपले नेतृत्व सिद्ध करावे लागणार आहे.

विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोनाविषयी वैद्यकीय सल्ला !

खासदार सी. आर. पाटील हे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकारुत येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म पिंप्री अकारुत येथेच झाला. त्यांचे शिक्षण आयटीआयपर्यंत झाले आहे.

सुरतमध्ये 1989 मध्ये पोलिस कॉन्स्टेबलपदी ते भरती झाले होते. त्यानंतर सुरतमध्ये सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जीआयडीसीच्या अध्यक्षपदापासून भाजपची संघटनेतील अनेक महत्वाची पदे त्यांनी सांभाळली आहेत.

उद्धव ठाकरेंना आमंत्रित करा, ‘या’ शिवसेना आमदाराने राम जन्मभुमी तीर्थ ट्रस्टला केली विनंती