fbpx

तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू

टीम महाराष्ट्र देशा- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांची भेट घेतली. याच दरम्यान नायडू यांची दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावर काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांची भेट झाली. यावेळी झालेल्या चर्चेवेळी भाजप विरोधात इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे. त्यासाठी देश आणि देशाचे भविष्य वाचविण्याबाबत आम्ही शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली आहे, असे चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले आहे.तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या असल्या तरी याचा फायदा कॉंग्रेसला होणार कि भाजपला हे निवडणुकानंतरचं समोर येईल.