जाणून घ्या हातांची आणि नखांची काळजी कशी घ्यावी?

टीम महाराष्ट्र देशा : साधारणता ३० वयोगटातील महिला खास खासकरून आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घ्यायला लागतात. कारण यानंतर वय वाढण्याची प्रक्रिया किंवा वय दिसण्याची प्रक्रिया सुरु होते. पण तुम्हांला हे माहित आहे का ? तुमच्या हातांनवरून सुद्धा तुमचं वय किती आहे हे कळू शकते.

जर हातांची काळजी घेतली नाही तर हातांच सुद्धा वय होऊ शकतं. एकंदरीतच आपल्या आयुष्यामध्ये आपण हातांच्या काळजीकडे दुर्लक्ष करत असतो. यामुळे हातांची आणि नखांची काळजी कशी घ्यायची हे आपण जाणून घेऊ या.

गृहिणी म्हणलं की आपण सगळ्यात जास्त लक्ष देतो ते आपल्या कपड्यांकडे, चेहऱ्याकडे आणि मेअकपकडे. आपल्याकडे एक महत्वाचा अवयव आहे त्याच्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही, ते म्हणजे आपले हात. हातांची काळजी घेण म्हणजे नेलपॉलिश लावणे क्रीम लावणे एवढचं. पण नक्की हातांची आणि नखांची काळजी नेमकी घ्यायची कशी ? यामुळे तुमची नखं आणि हात एकदम मस्त दिसतील. हे आपण पाहूया.

नखं साफ करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ धुवा. नखं खाऊ नका तसेच नखं खूप लांब वाढवू नका. लांब नखांमध्ये मळ साठू शकतो यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.

नखं मजबूत होण्यासाठी संतुलित आहार घ्या. यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन असेल याची काळजी घ्या. फळांचं प्रमाणही योग्य ठेवा. पाणी आणि इतर दवपदार्थांचं प्रमाण योग्य ठेवा. नखं साफ करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे साधारण गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ धुवा आणि फार टोकदार नसणाऱ्या फायलरने नीट शेप द्या.

महत्वाच्या बातम्या