ब्रिटिश कालिन हँकॉक पुलाच्या नवनिर्माणासाठी सह्यांची मोहिम

2 हजार लोकांनी केल्या सहया

मुंबई : डोंगरी-माझगावला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन हँकॉक पुलाला पाडून दोन वर्षे उलटली आहेत. त्याजागी पर्यायी पादचारी पुल उभारण्यास चालढकल करणाऱ्या रेल्वे आणि मुंबई महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच सुनावले होते.हा सर्व समान्यांसाठी असलेला पूल आहे.हा प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसेल तर पगार कसला घेता.अशा तिखट शब्दांत मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम.एस. सोनक यांच्या खंड पिठाने पालिका व रेल्वे प्रशासन यंत्राणांची चांगलीच कानउघाड़णी केली होती.

मागील दोन वर्षात पूल नसल्याने रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या काही निष्पाप विद्यार्थ्यांचा आणि प्रवाशांचा रेल्वे अपघातात हकनाक बळी गेला होता. त्या संदर्भात रेल्वे प्रशासन आणि पालिके विरुद्ध स्थानिकांनी विविध मार्गानी जनआंदोलन केले होते. पादचारी पूल नसल्याने येथे जाण्यायेण्यास जवळपास 7 कि.मी.चा वळसा घालून सैंड्हर्स्ट रोड ते माझगाव,भायखळा असा द्राविडी प्राणायाम करीत लोकांना जावे – यावे लागत आहे, यात वेळ आणि पैसा निष्कारण वाया जातोय.

शुक्रवारी उच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर अवघ्या 4 दिवसात म्हणजेच बुधवार 22 नोव्हेंबर 2017 ला मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे प्रशासनास तोडगा काढण्यास बजावले असून याचिकेची सुनावणी तहकूब केलेली आहे.याच पार्श्वभूमिवर स्थानिक लोकांतील जनजागृती आणखी तीव्र व्हावी म्हणून डोंगरी नुरबाग येथील चौकात मागील दोन वर्षां पासून या संदर्भात पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांच्यासह चारुदत्त भाटकर,जेजे रुग्णालय चतुर्थश्रेणी कर्मचारी अध्यक्ष कृष्णा रेणोसे,समीर शिरवडकर,पराग मांजरेकर,मयूर साळवी,अमित मालवणकर आदी कार्यकर्त्यांनी पूलाच्या नवनिर्माणासाठी सह्यांची मोहिम सुरु केलेली आहे.ही बातमी लिहित असे पर्यंत जवळपास 2 हजार लोकांनी सहया करुन ब्रिज लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केलेली आहे.

You might also like
Comments
Loading...