हलाल सिनेमाच्या फलकांना अवामी विकास पार्टी च्या कार्यकर्त्यांनी फासले काळे

halal

पुणे : तिहेरी तलाकच्या प्रथेवर आधारित हलाल या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे . या चित्रपटाला विरोध म्हणून काही मुस्लीम तरुणांनी राजन खान यांच्या अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कर्यालयाच्या 2 ,3 फलकांना तसेच हलाल सिनेमाच्या फलकांना मुस्लिम तरुणांनी काळे फासल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे . राजन खान यांच्या हलाला कथेवरून तयार करण्यात आला आहे .
गेल्या काही दिवसांपासून तिहेरी तलाक च्या मुद्द्यावरून देशभर वातावरण तापलं आहे . मुस्लीम कट्टरपंथीयांनी न्यायालयाने आमच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असं सांगण्यात आल होत . न्यायालयाने अशा पद्धतीने तलाक देता येणार नाही असा आदेश काढला आहे . या पार्श्वभूमीवर येत्या ६ ऑक्टोबर ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे . या चित्रपटात मुस्लीम धर्मातील हलाल या पद्धतीवर आधारित कथानक आहे .चित्रपटात कथानकामुळे भावना दुखावल्याचं सांगत अवामी विकास पार्टी च्या 4 तरुणांनी खान यांच्या कार्यालयात येऊन फलकांना काळे फासलेयावेळी खान कार्यालयात हजर नव्हते हलाल सिनेमाच्या पोस्टर्स वर वर काळी शाई ओतून काही पत्रकं कार्यालयात ठेवून कार्यकर्ते निघून गेलेLoading…


Loading…

Loading...