Hair Growth | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी करा ‘या’ सोप्या टिप्स फॉलो

Hair Growth | टीम कृषीनामा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच निरोगी केस हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. निरोगी केसांसाठी केसांना नेहमी तेल लावण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देतात. कारण नियमित तेल लावल्याने केस तुटणे, केस गळती, कोंडा इत्यादी समस्या सहज दूर होतात. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरतात. त्याचबरोबर केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी तुम्ही पुढील सोप्या टिप्स फॉलो करू शकतात.

खोबरेल तेल आणि कढीपत्ता (Coconut oil and curry leaves-For Hair Growth)

केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल आणि कढीपत्ता उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये सात ते आठ कढीपत्ते मिसळावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे तेल कोमट करून घ्यावे लागेल. या तेलाने केसांना हलक्या हाताने मसाज केल्यावर केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा या तेलाचा वापर करू शकतात.

मोहरीचे तेल आणि मेथी (Mustard oil and fenugreek seeds-For Hair Growth)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि मेथीचा वापर करू शकतात. कारण या दोन्हीमध्ये विटामिन ई, अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या दाण्याची पेस्ट तयार करून मोहरीच्या तेलामध्ये मिसळून घ्यावी लागेल. हे तेल तुम्हाला साधारण एक तास केसांना लावून ठेवावे लागेल. एका तासानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागतील.

खोबरेल तेल आणि कोरफड (Coconut Oil and AloeVera-For Hair Growth)

तुम्ही जर केस वाढवण्याचा विचार करत असाल, तर खोबरेल तेल आणि कोरफडीचे मिश्रण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये आवश्यकतेनुसार कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण हलक्या हाताने केसांना लावावे लागेल. साधारण एक तास हे मिश्रण केसांवर ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस मऊ, लांब आणि चमकदार होऊ शकतात.

केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी तुम्ही वरील सोपे उपाय करू शकतात. त्याचबरोबर केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही खालील पर्यायांचा वापर करू शकतात.

कोरफड (Aloevera-For Hair Fall)

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. कोरफड केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीच्या मदतीने केसांच्या वाढीस चालला तर मिळतेच पण त्याचबरोबर केस गळती थांबते. यासाठी तुम्हाला केसांना कोरफडीचा गर साधारण 30 मिनिटे लावून ठेवावे लागेल. तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागते. नियमित कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

कांद्याचा रस (Onion juice-For Hair Fall)

केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. कांद्यामध्ये आढळणारे सल्फर केस गळती कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं कांद्याचा रस केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागतील. नियमित कांद्याचा रस केसांना लावल्याने केस निरोगी राहू शकतात.

ग्रीन टी (Green tea-For Hair Fall)

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे केसांची वाढ होण्यास आणि केस गळती थांबवण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला ग्रीन टी बनवून तो थंड करून त्यानंतर तो केसांना लावावा लागेल. तुम्हाला  ग्रीन टी तासभर केसांवर ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस थंड पाण्याने धुवावे लागतील.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या