Hair Fall- केस गळतीवर उपाय..

hair fall

प्रदुषणामुळे किंवा संप्रेरकांमधील असंतुलनामुळे अवेळी केस गळू लागतात. कितीही दर्जेदार प्रसाधनं वापरली तरी केसगळती थांबत नाही. अशा वेळी एक उपाय परिणामकारक ठरतो. यासाठी एका कांद्याचा रस, पाच लसणाच्या पाकळ्या आणि एका अंड्याचा बलक ही सामग्री घ्या. लसून सोलून ठेचून घ्या. ही पेस्ट कांद्याच्या रसात मिसळा. या मिश्रणात अंड्याचा बलक घाला. मिश्रण एकजीव करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवा. महिन्यातून एकदा हा उपाय योजला तर गळती थांबते आणि केसांवर चमक येते.