टीम महाराष्ट्र देशा : या वर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली आहे. उन्हाच्या उष्णतेने त्रस्त झालेल्या जीवाला या पावसाने आल्हाददायक वाटत आहे. पावसाळा आला की केसांची आणि त्वचेची काळजी सर्वाना सतावत असते. मात्र पावसात भिजायचं तर असतच पण त्वचेची आणि केसांची चिंता तर असतेच. प्रवासात तर केसांची अजूनच निगा राखावी लागते.
जाणून घ्या पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी
- वेगवेगळ्या हेअर स्टाइल करण्यासाठी हेअर स्प्रे, हेअर जेलचा वापर केला जातो. मात्र पावसाळ्यात याचा वापर करणं शक्यतो टाळावं.
- पावसाळ्यातील वातावरणातील ओलावा, आद्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा केस धुवावेत.
- केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पूचा वापर करावा. केस धुतल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी कंडिशन करावेत.
- पावसाच्या पाण्यात केस भिजल्यास लगेच धुवून घ्यावेत.
- पावसाळ्यात केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. जेणेकरून जास्त केस तुटणार नाही.
- लिंबाचा रस केसांना लावून १५ मिनिटांनी केस धुतल्यास केस तेलकट आणि चिकट होणार नाहीत.
- केस ओले असताना बांधून ठेवू नये, त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊन केसात खाज होऊ शकते.
- पावसाळ्यात केसांना आठवड्यातून एकदा तरी तेल लावून मसाज करावे जेणेकरून केस चांगले राहतात.
तर यंदाच्या पावसाळ्यात या टिप्स नक्की वापरा. आणि केसांची काळजी घ्या. तसेच पावसाळ्यात आरोग्याची ही काळजी घ्या.
‘ह्या’ भाज्या पावसाळ्यात चुकून सुद्धा खाऊ नका !
कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाकडून पेढे वाटून स्वागत
Pune IT- पुण्यात आय टी इंजीनियर तरुणाची आत्महत्या