जालना : राज्याला बुधवारी रात्री विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. यात मराठवाडा आणि विदर्भात वीज पडून एकूण ६ जण ठार झाले.नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात माधव दिगंबर वाघमारे (५०), तर चिंचखेड येथे आनंदराव शामराव चव्हाण (६५) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात तडेगाव येथील राहुल रामसिंग सुंदरडे (२७) यांचा वीज पडून मृत्यू झाला.
मराठवाड्यात नांदेड, हिंगोली भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड आणि जालना जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिके उद्धवस्त झाली आहेत. आधी अतिवृष्टी, पुरामुळे खरीप हंगाम हातचा गेला, आता गहू, हरभरा, ज्वारी, कांदा ही रब्बी पिकेही उद्धवस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
अवकाळी पावसाने राज्यभरात पिके भुईसपाट
मराठवाडा, विदर्भासह नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना गारपिटीने झोडपले. कोल्हापूर, सांगलीतही बुधवारी आणि गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नाशिकमध्ये द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. तर कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील जोगेवाडी धनगरवाड्यावर बर्फवृष्टी झाली. कोकणातही पनवेल, कामोठे येथेही विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारपीट झाली.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी ताटं वाजवायला लावून देशात अवदसा आणली – नाना पटोले
- कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाची वेळ कमी होण्याची शक्यता !
- ‘ज्यांचे नगरसेवक मोजायला हाताची बोटं पुरेशी आहेत, अशांनी महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी करणे हास्यास्पद’
- ‘काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला’
- कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू