fbpx

हिंदूंमधील ‘हाफीज सईदांचा’ सरकारने बंदोबस्त करावा ; प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar

कोल्हापूर : पोलिस खाते देशाशी प्रामाणिक नाही. त्यांच्यातीलच अनेक अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. तसेच हिंदूंमधील ‘हाफीज सईदांचा’ सरकारने बंदोबस्त करावा. नाहीतर जनतेला त्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन करण्याची वेळ येईल. कोरेगाव भीमा प्रकरणास शासनच जबाबदार असून पोलिस कार्यकर्त्यांवर चुकीची कारवाई करत आहेत. असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले.

कोरेगाव भीमा दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट बंद ची घोषणा केली होती. त्यानंतर संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अनियंत्रित हिंदू संघटना देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राला दुसऱ्यांदा आम्ही जातीय दंगलींपासून वाचवले. भारताचा पाकिस्तान होऊ नये, इतके सरकारने पाहावे. हाफीज सईद जसा पाकिस्तानमध्ये सत्ता ताब्यात घेऊ पाहत आहे, तसे इथे होऊ नये. दलित संघटनांचा मी काल, आज आणि उद्याही ‘राजा’ असेन, माझ्यापुढे इतर सगळे कागदी वाघ आहेत.