तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील ; प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगावमध्ये मध्ये जी दंगल घळली त्यामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींना जर कठोर शिक्षा झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीवरून हिंदू संघटनांवर आरोप होत आहेत. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये महात्मा फुले परिषदेतर्फे माजी खासदार सुखलाल कुशवाह यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप विरोधात लाठी रॅली आयोजित करण्यात आली होती. आयोजित केलेल्या रॅलीला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. रॅलीनंतर प्रकाश आंबेडकर भाषणात बोलत होते.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
गुजरातमध्ये जर काँग्रेसने आदिवसी बांधवांपर्यंत त्यांचा अजेंडा पोहचवला असता तर भाजपच्या हातून काँग्रेसने सत्ता हिसकावून घेतली असती. मात्र तसे घडले नाही, तसेच भीमा कोरेगावमध्येही २०० वर्षांपूर्वी महारांच्या सैन्याने पेशव्यांची दाणादाण उडवली होती कारण पेशवे स्पृश्य-अस्पृश्य असा भेद मानत होते. ज्या महार बांधवांनी लढाई केली ते हिंदू नव्हते का? असाही प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच पोलिसांनी दोषींना सोडून पीडितांवर कारवाई केली. हि कारवाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर होत असून महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगावच्या दोषींवर कठोर कारवाई केली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील हे विसरू नका असा इशारा दिला.