fbpx

पाकडे घाबरले; हाफिज सईद, मसूद अजहरला भूमिगत राहण्याच्या सूचना

टीम महाराष्ट्र देशा – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले.गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.

यांनतर भारतने कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दहशतवादी गटांचे म्होरके मसूद अजहर आणि हाफिज सईद यांना पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याची सूचना दिल्या आहेत आहे.

त्याचबरोबर सुरक्षित स्थळी भूमिगतपणे राहण्यासही सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारकडूनच या दोन्ही म्होरक्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही सभेमध्ये सहभागी होऊ नका, सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ नका. सुरक्षित ठिकाणी घरातच राहा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.