काश्मीरात हिंदू बहुसंख्य असते तर कलम ३७० ला धक्काही लावला नसता : कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा :  भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पी. चिदंबरम यांनी या निर्णयाला धार्मिक रंग दिला आहे. त्यामुळे त्यांचावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.

माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम ३७० हटवलं असतं का ? असा प्रश्न उपस्थित केल आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शवत पी चिदंबरम यांनी भाजपावर टीका केली आहे. पुढे पोलताना त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये बहुसंख्य हिंदू असते तर कलम ३७० भाजपाने कधीही हटवलं नसतं असं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय मीडिया त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

Loading...

तसेच हा निर्णय घेताना विरोधकांनी विरोध दर्शवला नाही. आम्हाला बीजेडी, तृणमूल काँग्रेस, जद (यू), वायएसआर काँग्रेस, टीआरएस या पक्षांनी सहकार्य केले नाही कारण ते भाजपाला घाबरत आहेत असंही चिदंबरम यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरमधील परिस्थिती अशांत असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, मोदी सरकारने मोठा निर्णय घेत कलम ३७० काढून टाकले असून काश्मीर राज्याचे विभाजनही करण्यात आले आहे. यानुसार आता राज्याबाहेरील जनतेला काश्मीरमध्ये वास्तव्य करता येणार आहे. तसेच काश्मीर आणि लडाख यांना केंद्र्शाशित प्रदेशाचा दर्जाही देण्यात आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण