Share

Uddhav Thackeray । “भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आता मुख्यमंत्री झाले असते”; उद्धव ठाकरे यांचा टोला

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा मुंबईत पार पडत आहे. हा सोहळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी गौप्यस्फोट केलाय. १९९९ मध्ये आणखी चार महीने वेळ मिळाला असता तर राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून सर्वाधिक जागा निवडून आल्या असत्या आणि छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असा  खुलासा केला आहे.

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलय. भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना अजित दादा तुम्ही छगन भुजबळ हे मुख्यमंत्री कधी झाले हे सांगितले, पण मी सांगतो ते शिवसेनेत असते तर त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते असं उद्धव ठाकरे म्हणालेत. भुजबळ आणि आम्ही एकाच व्यासपीठावर बसू असे कोणी तीन वर्षापूर्वी सांगितले असते तर विश्वास ठेवला नसता पण हे आज घडत आहे असेही ठाकरे म्हणाले.

इतकंच काय तर छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले पण सगळी राष्ट्रवादी शिवसेनेत घेऊन आले आणि सोबत कॉँग्रेसला देखील घेऊन आले असेही ठाकरे यांनी म्हंटलंय. पुढे ते म्हणाले कि, छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर त्या आधीच मुख्यमंत्री झाले असते, सरकार वाकविण्यात ते खूपच पटाईत आहेत, ते आधी सांगितले पाहिजे होते. मात्र भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा मोठा धक्का बसला. कुटुंबातील माणूस सोडून कसा जाऊ शकतो, त्यातून सावरताना आम्हाला खूप वेळ लागला. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सतत आणि सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा राजकारणाने विचार करणं हे गरजेच आहे. मला पाहिजे सर्व पाहिजे आणि प्रतिस्पर्धी कुणी शिल्लकच उरला नाही पाहिजे. भुजबळ याच एक चांगल उदाहरण असल्याचं त्यांनी म्हंटल. त्यांचा राजकीय जन्म हा शिवसेनेत झाला. मात्र त्यांना त्यानंतर आयुष्यात काय करायचं होतं ते केलचं”,असं देखील उद्धव ठाकरे याप्रसंगी बोलताना म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

 

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा मुंबईत पार पडत आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics