हॅकिंग हल्ल्यांमुळे अमेरिका आणि चीनमधील तणावात आणखी वाढ

hacking

नवी दिल्ली-  परस्परांच्या सायबर सुरक्षेवरील केलेल्या हॅकिंग हल्ल्यांमुळे अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील तणावात आणखी वाढ झाली आहे. चीनच्या सुरक्षा मंत्रालयासाठी काम करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज ई मेल सॉफ्टवेअरवर मोठ्या हल्ल्याचा कट आखला होता.  हा कट उघडकीस आल्याने दोन्ही देशांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

अमेरिकेचे मित्रदेश असलेले युरोपिअन महासंघ, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, जपान आणि नाटो या संघटनेनं सुद्धा चीनच्या सायबर हल्ल्यांचा कट उघड करत चीनवर टीका केली आहे. नाटोनं प्रथमच चीनच्या सायबर हल्ल्यांचा निषेध केला आहे असं व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जेन साकी यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला हॅकिंगची जागतिक मोहीम राबवल्याचे दावे चीननं फेटाळले असून अमेरिका सगळ्या देशांवर अवैधरीत्या पाळत ठेवत असल्याचा प्रत्यारोप चीननं केला आहे. अमेरिकेच्या प्रोत्साहनामुळेच नाटोने सायबर स्पेसला नवीन रणांगण बनविलं असून यामुळे सायबर शस्त्रास्त्रांच्या शर्यतीला चालना मिळेल असं चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP