हॅकर्सचा कॉसमॉस बँकेवर डल्ला, तब्बल ९४ कोटी ४२ लाख लांबवले

पुणे : एखाद्या चित्रपटाच्या शोभेल अशा पद्धतीने पुण्यातील कॉसमॉस बँकेवर हॅकर्सनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे, परदेशी हॅकर्सनी कॉसमॉस बँकेतील काही खाती हॅककरून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये हॉंगकॉंगच्या एका बँकेमध्ये वळते केले आहेत. या प्रकरणी चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवेअर व्हायरसचा वापर करून बँक ग्राहकांच्या व्हिसा आणि डेबिट कार्डची माहिती चोरण्यात आली, या माहितीच्या आधारे पुण्यातील गणेशखिंड रोडवर असणाऱ्या कॉसमॉस बँकेच्या खात्यावर प्रथम ११ ऑगस्टला झालेल्या हल्ल्यात कॅनडासह २४ देशातून अवघ्या २ तासात ८० कोटी रुपये काढले. तर १३ ऑगस्टला दुपारी १३ कोटी ९२ लाख रुपये वळवण्यात आले होते.

दरम्यान, पुण्यातील बँकेतून चोरण्यात आलेली रक्कम हॉंगकॉंगच्या हॅनसेंग बँकेच्या एएलएम ट्रेडिंग लिमिटेड यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेण्यात आले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर आता बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

फेसबुकवरून बदनामी, सुप्रिया सुळेंनी केली पोलिसात तक्रार

रायगड जिल्हयातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 241 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर