fbpx

हॅकर म्हणजे चोर असतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा – महाजन

टीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सईद शुजा या सायबर हॅकरने ईव्हीएम यंत्राच्या हॅकिंगसंदर्भात आणि मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे. तर गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाष्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता, तसेच हॅकर म्हणजे चोर असतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा अस म्हणत गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी  अमेरिकन हॅकरची माहिती खोटी असल्याच म्हंटल आहे.

प्रकाश महाजन म्हणाले की , गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाष्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता; इव्हीएम नव्हते तेव्हाही मुंडे मताधिक्याचा आकडा सांगायचे आणि लिहून ठेवा असेही सांगायचे, त्यांचा तेवढा अभ्यास होता. तसेच महाजन यांनी हॅकरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर हा गेली साडेतीन 4 वर्षे कुठे होता. आताच का तो बोलला. हॅकर म्हणजे चोर असतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

१९८५ मध्ये मुंडे इव्हीएम नव्हते तेव्हा प्रत्येक मतदारसंघात किती मते पडतील याचा आकडा सांगायचे आणि लिहून ठेवा, असे आव्हानही द्यायचे. त्यांचा प्रत्येक मतदारसंघाचा मतदारांच्या कौलाचा अभ्यास होता. यामुळे ते इव्हीएमच्या हॅकिंगवर विश्वास ठेवतील असे वाटत नाही, असे सांगत हॅकरचा दावा हेतूपुरस्सर असल्याचे सांगितले.