जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची सुवर्णपदकाला गवसणी

टीम महाराष्ट्र देशा: तुर्कीच्या मर्सिन शहरात एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

दीपा २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये वॉल्ट प्रकारात चौथ्या स्थानावर राहिली होती. काल तिने वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये १४.१५० गुण मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये जिंकलेलं हे दीपाचं पहिलंच पदक आहे.दीपाचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी हे ही आज तिच्यासोबत होते. रिओ ऑलिम्पिकनंतर दीपा जायबंदी होती. तिच्यावर सर्जरीसुद्धा झाली होती. कॉमनवेल्थ गेम्सपर्यंत ती फीट होऊन पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. मात्र या दुखापतीतून बरे व्हायला तिला खूप अवधी लागला.

जागतिक बॅडमिंटन; पी . व्ही . सिंधू चा उपांत्य फेरीत प्रवेश

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील खेळाडूंना सचिनकडून शुभेच्छाLoading…
Loading...