ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान… नही सहेंगे संतो का अपमान – आमदार प्रकाश गजभिये

नागपूर दि.१० जुलै – ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान… नही सहेंगे संतो का अपमान असा फलक हातात आणि संत तुकाराम यांचा पेहराव करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना अटक करण्याची मागणी केली.

संभाजी भिडे यांच्या मनुवादी विचारांचा निषेध म्हणून आमदार प्रकाश गजभिये यांनी संत तुकारामांचा पेहराव करुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार वैभव पिचड, आमदार नरहरी झिरवळ उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार प्रकाश गजभिये यांनी संभाजी भिडे यांचा पेहराव करत त्यांच्या शेतातील आंबे भाजप मंत्री आणि आमदारांना देत आंदोलन करत लक्ष वेधले होते आणि आज संताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी आमदार प्रकाश गजभिये चक्क संत तुकारामांच्या वेषामध्ये विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले.

राष्ट्रवादीचे आमदार भिडे गुरुजींच्या वेशात ; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनोखे आंदोलन