गुट्टेने घोटाळ्याचा पैसा ‘अॅस्कीडेंटल प्राईम मिनिस्टर’हा चित्रपट बनवायला वापरला

वेबटीम : शेतकऱ्यांच्या नावावर घेतेलेल्या ३२८ कोटींचा बोगस कर्ज घोटाळा सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. दररोज या घोटाळ्यातील नवनवीन प्रकरण समोर येत आहेत.या प्रकरणात  आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षांकडून नवीनच आरोप करण्यात येत आहे .

या बोगस कर्ज घोटाळ्यातील मुख्य आरोपी रत्नाकर गुट्टे याच्या मुलाने भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित असणारा  ‘अॅस्कीडेटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट बनवण्यासाठी घोटाळ्यातील रकमेचा वापर केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या बाबतच वृत्त ‘ हिंदुस्तान टाईम्स’कडून देण्यात आल आहे.

रत्नाकर गुट्टे याचा मुलगा असणारा विजय गुट्टे याने या आधी हि ‘बदमाशीयां’ आणि ‘इमोशनल अत्याचार’ या हिंदी चित्रपटांची निर्मिती केल्याच बोलल जात आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि उद्योगपती रत्नाकर गुटे यांच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाड्यातील १५ हजार शेतकऱ्यांच्या नावावर रत्नाकर गुट्टे यांनी तब्बल ३२८ कोटी रुपयांचं कर्ज उचललं होतं. विशेष म्हणजे याबद्दल संबंधित शेतकऱ्यांना कल्पनादेखील नव्हती.

रत्नाकर गुट्टेचे सत्ताधाऱ्याची असणारे संबद पाहता या प्रकरणी सरकारमधील नेत्यांचे हात देखील या प्रकरणात अडकले असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे .